पुणे: कोंढवा येथील क्वारंटीन सेंटर मध्ये गळफास घेत 60 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाची आत्महत्या
पुण्यात कोंढवा (Kondhwa) येथे 60 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाने क्वारंटीन सेंटर (Quarantine Centre) मध्ये आत्महत्या (Suicide) करून आपलं जीवन संपवलं आहे.
पुण्यात कोंढवा (Kondhwa) येथे 60 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाने क्वारंटीन सेंटर (Quarantine Centre) मध्ये आत्महत्या (Suicide) करून आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना काल (6 जुलै) ची आहे. दरम्यान त्याची आणि त्याच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली होती. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 5368 नवे कोरोना बाधीत रुग्ण, तर 204 जणांचा मृत्यू.
पुणे मिररच्या वृत्तानुसार, 60 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाने बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेतला. दरम्यान त्यांच्या मुलासह अन्य 3 जणांसोबत ते एका चेंबरमध्ये राहत होते. मात्र ते ब्रेकफास्टसाठी बाहेर गेल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णाने आपलं जीवन संपवलं. जेव्हा 3 जण परत आले तेव्हा दरवाजा उघडत नसल्याने तो तोडून आत आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या खोलीमध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
ANI Tweet
अजून एका क्वारंटीन सेंटरमध्ये एका व्यक्तीचा कार्डिएक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान डॉक्टर रूग्णापर्यंत पोहचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
काल रात्री आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 5368 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच 204 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,11,987 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसमुळे 9,026 जणांचा बळी गेला आहे.