Ganeshotsav 2019: पुण्याच्या परंपरेला धक्का नाही, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक वेळा ठरल्या; असे असेल नियोजन
त्यानंतर मानाचे इतर 4 व त्या पाठोपाठ बाकीचे सार्वजनिक मंडळांचे गणपती विसाराजानासाठी मार्गस्त होतात. मात्र मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने होत असल्याने हे पाच गणपती विसर्जित होण्यासाठी संध्याकाळ उजाडते. यामुळे इतर सार्वजनिक मंडळापैकी शेवटचा गणपतीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत चालते
2 सप्टेंबरपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2019) सांगता येत्या गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी होत आहे. पुण्यात मानाच्या पाच गणपतींच्या आगमनाने गणेशोत्सवाला सुरुवात होते तर याच गणपतींची विसर्जन मिरवणूक पहिल्यांदा निघते. दरवर्षी साधारण 10 वाजता कसबा गणपती बाहेर पडतो. त्यानंतर मानाचे इतर 4 व त्या पाठोपाठ बाकीचे सार्वजनिक मंडळांचे गणपती विसाराजानासाठी मार्गस्त होतात. मात्र मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने होत असल्याने हे पाच गणपती विसर्जित होण्यासाठी संध्याकाळ उजाडते. यामुळे इतर सार्वजनिक मंडळापैकी शेवटचा गणपतीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत चालते.
याबाबत मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी 7 वा. सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत पहिल्या पाच गणपती मंडळांनी आम्ही परंपरा मोडणार नाही, नाहीतर श्रींचे विसर्जनच होणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर आज मानाच्या पाचही गणपतींचे मिरवणूक मार्ग आणि वेळ निश्चीत करण्यात आली आहे.
श्री कसबा गणपती -
ही विसर्जन मिरवणूक सकाळी 11.15 वा. बेलबाग चौक येथून सुरु होईल. यंदा रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना आणि कलावंत ढोलताशा पथके सहभागी होणार आहेत. दुपारी 3.15 वाजता टिळक चौकातून लक्ष्मी रोडमार्गे ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होईल.
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती -
जोगेश्वरी चोकातून सकाळी 9 वा. हा गणपती प्रस्थान करेल. अब्दागिरी, मानचिन्हे आणि चांदीची पालखी असा बाप्पानाचा थाट असणार आहे.
श्री गुरूजी तालीम गणपती -
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ विसर्जन मिरवणूक मुख्य रस्ता लक्ष्मी रोड मार्गाने सकाळी 10.30 वा. सुरु होणार आहे. श्रीं च्या मिरवणुक साठी सुभाषशेठ व स्वप्निल सरपाले यांनी फुलांचा 'हरे कृष्णा रथ' आकर्षक रथ बनविला आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: पुण्यातील मानाचे पाच गणपती; जाणून घ्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आणि महत्व)
श्री तुळशीबाग गणपती -
यंदा 22 फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या 'मयुरासना'वर 'गणराय' विराजमान होणार आहेत. मिरवणुकीला सकाळी सुरुवात होईल. यामध्ये लोणकर यांचे नगारावादन होणार आहे. तर स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी, हिंद तरूण मंडळ या ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे.
केसरीवाडा गणपती -
केसरीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती. फुलांनी सजविलेल्या पालखीमधून बाप्पांची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत बिडवे यांचे नगारावादन होणार आहे. तर श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांचे ढोलताशा वादन होणार आहे. यावेळी इतिहास प्रेमी मंडळातर्फे केसरीवाडा बाप्पांच्यासमोर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला 125 वर्षे पूर्ण झाल्याचा देखावा सादर केला जाणार आहे. केसरीवाडा गणपतीची मिरवणूक केळकर मार्गावरून मार्गस्थ होणार आहे.