पुणे: रामभाऊ म्हाळगी शाळेत 22 विद्यार्थी आणि शिक्षकाला मध्याह्न भोजनातून विषबाधा; भारती रुग्णालयात उपचार सुरू

त्यानंतर तात्काळ त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

पुण्यातील कात्रज भागात आज (21 ऑगस्ट) मध्याह्न भोजनातून (Mid Day Meal )विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील (Rambhau Mhalgi School) 22 विद्यार्थ्यांना भातातून विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांसोबतच काही शिक्षकांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधित विद्यार्थ्यांना भारती रुग्णलयात (Bharti Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थांना उलट्या, अतिसार याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ANI Tweet

भारतात मध्यान्ह भोजन योजना 1995 साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. शाळेतील मुलांची गळती कमी करणे, उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे या उद्दिष्टाने ही योजना सुरू झाली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत 8वी पर्यंतच्या मुलांना धान्य/डाळी दिल्या जात असे. मात्र नंतर 2002 साली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, अन्नपदार्थांऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे करण्यात आले आहे.