Badlapur Rape Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना रोजगार आणि घर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

घर सोडून बहिष्कृत जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. कमावता मुलगा गेल्याने उपासमार सहन करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालय (Photo Credit : ANI)

Badlapur Rape Case: काही महिन्यांपूर्वी बदलापुरमधील आदर्श शाळेतील(Adarsh ​​School) दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची (Badlapur Rape Case) घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे(Ashray Shinde) याचा एन्काऊंटरमध्ये (Encounter)मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर अनेक संकंटे निर्माण झाली आहेत. त्यांचा कमावता मुलगा गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी म्हटलं. त्यांना घर सोडून राहण्याची वेळ आली. ही कैफियत अक्षय शिंदेच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात(Bombay High Court) मांडली. त्यावर सुनावणीदरम्यान, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांना रोजगार आणि घर देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार

बदलापूरमधील नामंकित आदर्श शाळेत काही महिन्यांपीर्वी दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केले होते. अक्षय शिंदे याच शाळेचा कर्मचारी होता. या घटनेनंतर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. तळोजा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. 23 सप्टेंबरला त्याला तपासणीसाठी नेण्यात आलं. त्या दरम्यान झालेल्या झटापटीत गोळीबार झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.(Badlapur Sexual Assault: अक्षय शिंदे याच्या आईचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांवर मानहानीचा दावा; बिनशर्त माफी, नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव)

 अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांसमोर गंभीर समस्या

या घटनेनंतर अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यांना घर सोडून बहिष्कृत जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. कमावता मुलगा गेल्याने उपासमार सहन करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यामूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.(Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे च्या मृतदेहाचं पोस्टमार्टम आज जे जे हॉस्पिटल मधील तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम करणार)

सरकार किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मदत 

अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. आता त्याच्या आई-वडिलांना का त्रास सहन करायला लावतायं, सरकार किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अक्षयच्या आई वडिलांना मदत पुरवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif