Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक; 15 जण जखमी, 8 जणांची प्रकृती गंभीर

हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले.

Accident (फोटो सौजन्य - Pixabay)

Mumbai-Pune Expressway Accident: रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी सकाळी एका खासगी प्रवासी बसने ट्रकला धडक (Private Bus Collides With Truck) दिली. या अपघातात (Accident) आठ जणांची प्रकृती गंभीर असून 18 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तथापी, चार महिलांसह आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. (हेही वाचा -Palm Beach Road Accident: वडिलांचा मृत्यू, आईही रुग्णालयात, चिमुकलीवरील उपचारांचा खर्च 20 लाख रुपये; पाम बीच रोड अपघातग्रस्त कुटुंबाकडून आर्थिक मदतीसाठी आवाहन)

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट, खोपोली, आयआरबी आणि वाहतूक पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेली खाजगी बस थांबलेल्या ट्रकला धडकली. बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा - Accident On Thane-Belapur Road: दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीवर परिणाम झाला होता. परंतु, वाहतूक पोलिसांनी योग्य समन्वय साधून वाहतूक कोंडी दूर केली. या अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची आणखी चौकशी खोपोली पोलीस करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif