रामायण, महाभारत, शक्तिमान सोबत दूरदर्शनवर संविधान, डिस्कवरी ऑफ इंडिया चं देखील पुर्नप्रसारण सुरू करा: पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
संविधान” (Sanwidhan - Making of the Indian Constitution) आणि “डिस्कवरी ऑफ इंडिया” (Discovery of India) या मालिकांचा समावेश करून त्यादेखील पुन्हा सुरू करा अशी विनंती करणारं पत्र केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहलं आहे.
कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी भारतामध्ये 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान भारतामध्ये या काळात संचारबंदी असल्याने नागरिकांना घरीच बसणं भाग आहे. मग या लॉकडाऊनच्या काळात लोकाग्रहास्तव दूरदर्शनवर रामायण, महाभारत सारख्या पौराणिक मालिका ते अगदी शक्तीमान, श्रीमान श्रीमती सारख्या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये “संविधान” (Sanwidhan - Making of the Indian Constitution) आणि “डिस्कवरी ऑफ इंडिया” (Discovery of India) या मालिकांचा समावेश करून त्यादेखील पुन्हा सुरू करा अशी विनंती करणारं पत्र केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहलं आहे. यासोबतच जगप्रसिद्ध वैज्ञानिक लघुपट "Cosmos - A Personal Voyage by Carl Sagan" and the "Cosmos - A Spacetime Odyssey by Neil DeGrasse Tyson" अशा मालिका सुद्धा दूरदर्शवर दाखवाव्यात. परिणामी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटलं आहे. Shaktimaan New Timing: दूरदर्शन वर आजपासून शक्तिमान येणार भेटीला; पहा प्रक्षेपणाची नवीन वेळ.
दरम्यान दूरदर्शनवर या लॉकडाऊनच्या काळात रामायण सकाळी आणि रात्री 9 वाजता दाखवले जाते तर महाभारत दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता दाखवण्यात सुरूवात झाली आहे. आता यामध्ये शक्तिमान ही भारतीय सुपरहिरोची देखील दूरदर्शनवर पुन्हा एंट्री झाली आहे. दरम्यान रामायण या मालिकेच्या पहिल्या एपिसोडने टेलिव्हिजनवरील बड्या चॅनेलचेदेखील रेकॉर्ड मोडले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचं ट्वीट
कोरोना व्हायरसचा संसर्ग सध्या देशभरामध्ये झपाट्याने होत आहे. त्याला रोखायचं असेल तर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. यामुळे संसर्गाची वाढती साखळी तोडायला मदत होणार आहे. अद्याप कोरोना व्हायरसवर कोणताही ठोस उपचार नाही. लस बनण्यासाठी देखील सुमारे दीड वर्षाचा काळ लागू शकतो असं संशोधकाचं मत आहे. त्यामुळे घरात बसून केवळ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर फिरणार्या बातम्यांचा भडिमार सहन करण्याऐवजी अनेक जण टेलिव्हिजनच्या सुवर्ण युगातील काही जुन्या मालिका पुन्हा पाहणं पसंत करत आहेत. यामध्ये अधिक दर्जेदार मालिकांची भर पडावी म्हणून पृथ्वीराज चव्हाणांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)