PM Narendra Modi Yavatmal Visit Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचतगटातील महिलांना करणार मार्गदर्शन

महिला बचत गटांतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते महिलांना संबोधीत करतील. हा कार्यक्रम यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे संपन्न होणार आहे.

Narendra Modi | (Photo Credit: ANII)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महिला बचत गटांतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते महिलांना संबोधीत करतील. हा कार्यक्रम यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे संपन्न होणार आहे. सांगीतले जात आहे की, आजच्या कार्यक्रमासाठी जवळपास दील लाखांच्या आसपास महिला उपस्थित राहतील. आयोजकांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी 45 एकरावर मंडप उभारण्यात आला असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या दौऱ्यात ते काही राजकीय भाष्य करणार का याबाबत उत्सुकाता आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

महिला बचत गटांच्या महिला मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास साडेतीन हजार पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अमरावती परिक्षेत्रासह कडेकोट बंदोबस्त आहे. शिवाय पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंगीलाही शिरायला जागा असणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी पथकही तैनात आहे. राज्यातील आंदोलने आणि राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेची तपासणी करुनच प्रवेश दिला जाणार आहे. (हेही वाचा, Survey- PM Modi Most Popular Leader of World: पंतप्रधान नरेंद्र मोदी 78% पसंतीसह ठरले लोकप्रिय ग्लोबल लीडर)

पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल उत्सुकता

लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील आणि सबंध देशभरातील राजकीय पक्ष नेते, मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याकडेही त्याच दृष्टीकोणातून पाहिले जात आहे. आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान काही राजकीय भाष्य करतात का? नेहमीप्रमाणे एखाद्या कुटुंबाला राजकीय लक्ष्य करुन टीका करतात क, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi यांच्याकडून देशातील सर्वात लांब पूल 'सुदर्शन सेतू' चं उद्घाटन (Watch Video))

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांचाही सहभाग असणार आहे.