Mercedes Benz घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'फकीर' म्हणू नये; शिवसना खासदार संजय राऊत यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नव्या मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीवरुन टीका केली आहे.

Sanjay Raut Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामना या शिवेसेना (Shiv Sena) मुखपत्रातील आपल्या 'रोखठोक' (Rokhthok) या साप्ताहीक सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नव्या मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीवरुन टीका केली आहे. ही गाडी 12 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जाते. 2021 हे साल तर सरले. पण किमाण 2022 या नव्या वर्षात तरी आशेची किरणे दिसणार का? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 'महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. मात्र, पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहेट. मर्सिडीज बेंज घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी स्वत:ला 'फकीर' म्हणने बंद करावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे 'रोखठोक'मध्ये?

''पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे ‘दर्शन’ पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे'', असेही संजय राऊत यांनी आपल्या लेखात शेवटी म्हटले आहे.