Maharashtra Assembly Election 2019: पुण्यातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केला सोन्याचे नक्षीकाम असलेला फेटा (See Photo)
अशाच पद्धतीने याही वेळी मोदींनी त्यांच्या पुण्याच्या सभेत एक फेटा घातला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे या फेट्यावर असलेले सोन्याचे नक्षीकाम.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता काहीच दिवसनावर येऊन ठेपली आहे. प्रचाराचे शेवटचे काही दिवस उरले असल्याने प्रत्येक राजकीय पक्षांतील नेते आपला जोर आजमावताना दिसत आहेत. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रचार सभांमध्ये दिसत आहेत. त्यांचा सभांहूनही सध्या जास्त चर्चेत आहे तो म्हणजे त्यांनी पुण्याचा सभेत घातलेला भरजरी फेटा.
देशातील कोणत्याही भागात गेल्यावर तिथला पेहराव मोदी कायमच परिधान करतात. अशाच पद्धतीने याही वेळी मोदींनी त्यांच्या पुण्याच्या सभेत एक फेटा घातला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे या फेट्यावर असलेले सोन्याचे नक्षीकाम.
पहा फोटो
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील सभेला मोदींनी सोन्याचे वर्क केलेला फेटा घातला होता. इतकंच नव्हे तर, मोदींनी परिधान केलेल्या या फेट्यावर सोन्याचे नक्षीकामही करण्यात आले होते. हे नक्षीकाम निरखून बघितल्यास लक्षात येते की त्यावर भाजप पक्षाच्या कमल चिन्हाची नक्षी कोरण्यात आली आहेत ती ही सोन्याने.
या आधीही 2014 च्या निवडणुकांदरम्यान मोदींनी परिधान केलेला 9 लाखांचा सूट चर्चेचा विषय ठरला होता. आणि त्यावेळी राहुल गांधी आपल्या भाषणातून मोदी सरकारची ओळख 'सूटबूट की सरकार' अशीच करून द्यायचे.