PM Narendra Modi on Sharad Pawar: शरद पवार यांच्याकडून मिळते प्रेरणा, नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकोद्गार; काँग्रेसवर टीकास्त्र

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. एका बाजूला काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडताना त्यांनी शरद पवार NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी मात्र कौतुकोद्गार काढले. या वेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली

Sharad Pawar and PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. एका बाजूला काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडताना त्यांनी शरद पवार NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी मात्र कौतुकोद्गार काढले. या वेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली. शरद पवार हे नेहमी मला प्रेरणा देतात. त्यांनीही शरद पवार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. अजारी असताना आजही ते मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देतात. मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवार यांचे तीन वेळा नाव घेतले.

स्वातंत्र्य झाल्यापासून 2013 पर्यंत देश दुर्दशेत होता. मात्र, जनतेने 2014 मध्ये अचानक प्रकाश निर्माण केला. या प्रकाशामुळे जर कोणाची दृष्टीच गेली असेल तर मात्र त्यांना जुने दिवस आठवणार नाहीत, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केले. आपल्या सार्वजनिक जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. त्यातून कधी कधी व्यक्तीगत निराशा निर्माण होते. मात्र, असे असले तरी ती निराशा देशावर थोपवू नये. सत्तेत असेल तरच देशाची चिंता करायची. सत्तेत नसताना नाही. असं असतं का? असा सवाल विचारत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक करत म्हटले की, शरदरावांकडून प्रेरणा घ्यायला हवी. आज अजारी असतानाही ते आपल्या मतदारसंघात लोकांची सेवा करतात. लोकांना प्रेरणा देतात. तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही नाराज असाल तर तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्या मतदारसंघातील लोकही उदास होतात, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी टोलेबाजी केली. (हेही वाचा, PM Narendra Modi Speech in Parliament: 'मला वाटते कॉंग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याचे ठरवले आहे'- पीएम नरेंद्र मोदींनी साधला निशाणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2013 पर्यंत देशाने दुर्दशेत दिवस काढले. 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना जुने दिवसच दिसणार नाही, अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात चढ-उतार येत असतात. त्यातून व्यक्तीगत निराशा निर्माण होते, ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर असताना देशाची चिंता करायची नाही, असं असतं का? कुणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. नाराज होत असाल तर तुमचे जे मतदार संघ आहेत तिथले लोकही उदास होतील, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now