Prahlad Modi On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चहावला' नव्हेत ते तर 'चहावाल्याचा बेटा' - मोदी बंधू
त्यांना चहावाला म्हणने ही पत्रकारांची चूक आहे, असे स्पष्टोद्गार दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी काढले आहेत.
आमच्या बलपणी आम्ही सर्वच भावंडांनी चहा विकला. चहाचे दुकान हे आमचे नव्हते तर आमच्या वडीलांचे होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना 'चहावाला' (Chahawala) नव्हे तर चहावाल्याचा बेटा (Chawla's son) म्हणा. त्यांना चहावाला म्हणने ही पत्रकारांची चूक आहे, असे स्पष्टोद्गार दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी काढले आहेत. आम्हा सर्वच भावंडांना तेव्हा चहा विकावा लागायचा. प्रत्येक जण एक एक दिवस चहा विकायचा. पण, ज्याचा मुकूट मोठा असतो पत्रकारांकडून त्याच्याकडेच अधिक पाहिले जाते, असा टोलाही प्रल्हाद मोदी यांनी या वेळी लगावला. ते उल्हासनगर येथे बोलत होते. दरम्यान, प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना टोला लगावला की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना अशा बुचकाळ्यात उपस्थित पडले.
प्रल्हाद मोदी यांनी यांनी पुढे म्हटले की, आमच्या वडीलांनी चहा विकून आम्हाला मोठं केलं. आम्ही 6 भावंडं आठवड्यातून एक एक दिवस चहा विकायचो. त्यामुळे आम्ही चहावाला नव्हे तर चहावाल्याची मुलं आहोत. पण, अनेक पत्रकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चहावाला म्हणतात. त्यांना चहावाला म्हणनं ही पत्रकारांची चूक आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचा बेटा म्हणायला हवे, असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले. प्रल्हाद मोदी यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Prahlad Modi On GST: नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी म्हणतात 'मागण्या पूर्ण होईपर्यंत जीएसटी भरणे बंद करा')
व्हिडिओ
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे बंधू (PM Narendra Modi's Brother) असलेल्या प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी विविध मागण्यांवर आंदोलन करत व्यापारी आणि व्यावसायिकांच्या आक्रोशाला आवाज दिला आहे. प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत वस्तुस सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच जीएसटी (GST) भरणे बंद करा. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत प्रल्हाद मोदी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी असो किंवा इतर कोणी असो, त्यांना आपले ऐकावेच लागेल. तुम्ही सामूहिकपणए जीएसटी भरायला नकार द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला स्वत: भेटायला येतील, असेही प्रल्हाद मोदी म्हणले. देशभरातील सुमारे 6.50 लाख रेशन दुकानदारांचे आपण प्रतिनिधित्व करतो असाही प्रल्हाद मोदी दावा करतात.