Thane-Diva Railway Line: मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा नव्या मार्गिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

ठाणे ते दिवा (Thane to Diva) या मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे (Thane-Diva Railway Line) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज होणार आहे.

Narendra Modi | (Photo Credit: PMO)

मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. ठाणे ते दिवा (Thane to Diva) या मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे (Thane-Diva Railway Line) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीन वैष्णव उपस्थित राहणार आहेत. हे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी पाठिमागील आठवड्यांपासून अनेक वेळा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. अखेर हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या जाईपर्यंत मध्यम आणि लघु पल्ल्याच्या प्रवाशांना वाट पाहावी लागणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी साडेचार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या मार्गिकांचे लोकार्पण पार पडले. ही मार्गिका ठाणे ते दिवा या रेल्वे स्थानकांना जोडली जाणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरिय गाड्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते उपस्थितांशी भाषणाच्या माध्यमातून संवाद साधतील. (हेही वाचा, Mumbai Local Update: मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा नव्या मार्गिकेचं PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार लोकार्पण; 36 नव्या फेर्‍या धावणार)

ट्विट

कल्याण हे ठाणे जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर भागातून आणि दक्षिण भागातून येणारी वाहतूक कल्याण येथेच एकत्रित येते आणि पुढे ती सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने जाते. सीएसएमटी ते कल्याण या रेल्वे मार्गावर आतापर्यंत चारच मार्गिका होत्या. ज्यावरुन अप आणि डाऊन अशा धिम्या आणि जलद लोकल रवाना होत होत्या. तसेच त्यावरुन मालगाड्या आणि एक्सप्रेस गाड्याही धावत असत. त्यामुळे तसा विचार केला तर केवळ दोनच मार्गिका होत्या. परिणामी उपनगरिय गाड्यांना धावताना विलंब व्हायचा. आता स्वतंत्र मार्गिका झाल्यामुळे दीर्घ पल्यांची वाहतूक करणाऱ्या मार्गांसाठी अतिरिक्त मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे.