नरेंद्र मोदी यांच्या 'त्या' निवडणूक यशात भाजपच्या पगारी फौजांचे मोठे योगदान- शिवसेना

मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांनी या गोबेल्स टळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे 'मौनीबाबा' तर राहुल गांधी 'पप्पू' ठरविण्यात आले. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करु टाकले.

Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: narendramodi.in)

समाज माध्यमांतील 'लष्कर ए होयबा' राजकीय पक्ष व संघटनांचे पगारी नोकर असतात. ते आपल्या विचारांचा प्रचार करतात तसे इतरांविषयी जहरही पेरत असतात. 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपने मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपच्या समाज माध्यमांवर काम करणाऱ्या पगारी फौजांचे योगदान मोठे होते, असा आरोप शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून करण्यात आला आहे.

'फेसबुकचा राजकीय धंदा' या मथळ्याखाली शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, 'तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांनी या गोबेल्स टळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे 'मौनीबाबा' तर राहुल गांधी 'पप्पू' ठरविण्यात आले. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करु टाकले. गेल्या सात वर्षांत खोट्याचे खरे व खऱ्याचे खोटे करण्याचे प्रकार समाज माध्यमांतून उघडपणे झाले. (हेही वाचा, सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करण्यासाठी पार्थ पवार यांचा वापर? शिवसेनेला शंका)

दरम्यान, फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हकरत नाही. पण द्वेश पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेश पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्ममांचा वापर सुरु असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.