Primary School: विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळातून दुपारी झोपायला वेळ मिळणार? शिक्षण विभागाची नवी तरतूद
विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळातून दुपारी झोपायला वेळ मिळणार असल्याची शिक्षण विभागाकडून नवी तरतूद करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीचं शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) विद्यार्थ्यांच्या गृहपाठासंबंधी (Students Home Work) मोठा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळावा तसेच कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना यापुढे होमवर्क (Home Work) न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीत लवकरच शाळेतून नोटीस (School Notice) काढण्यात येणार आहे. . हा निर्णय आगामी शालेय शिक्षण वर्षात (Academic Year) हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मुलांच्या शैक्षणिक ओझे (Education Load) कमी होणार आहे. तरी राज्यातील विद्यार्थी (students) आणि पालकांसाठी (Parents) आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळातून दुपारी झोपायला वेळ मिळणार असल्याची शिक्षण विभागाकडून (Educational Department) नवी तरतूद करण्यात येणार आहे.
लहान मुलांच्या शाळेच्या ओझ्याच्या (educational load) विचार करता प्राथमिक शाळांच्या (Primary School) वेळा (Primary School Times Change) बदलण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय (Final Decision) लवकरच घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. (हे ही वाचा:- Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंकडून कॉंग्रेसला घरचा आहेर म्हणाले कॉंग्रेस पक्षातील लोक कटकारस्थानी)
‘लहान मुलांना झोपेची जास्त आवश्यकता असते. या मुलांची शालेय जीवनातील सुरुवातीची वर्षे महत्त्वाची असून, या काळातच मेंदूचा जास्त विकास होतो. मात्र, राज्यात शाळांच्या वेळा सकाळी सात वाजेपासून असून, अभ्यासाच्या दडपणामुळे मानसिक ताण जादा येतो. त्यामुळे या मुलांची व्यवस्थित झोप होऊन, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. तरी याबाबतचा कुठलाही निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाही अशी माहिती दिपक केसरकरांनी दिली आहे.