Preventive Orders in Mumbai: मुंबई पोलिसांनी जारी केले नवे प्रतिबंधात्मक आदेश; 24 एप्रिलपर्यंत लागू, जाणून घ्या कोणत्या गोष्टींना असेल परवानगी

हा आदेश 10 एप्रिलपासून लागू झाला असून 24 एप्रिलपर्यंत तो लागू राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 24 एप्रिलपर्यंत शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या बेकायदेशीर एकत्र येण्यावर बंदी घालणारा नवा प्रतिबंधात्मक आदेश (Preventive Orders) जारी केला आहे. शांतता भंग होणे, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने हा आदेश जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. नियमानुसार मिरवणुका काढणे, सार्वजनिक निषेध, फटाके फोडणे आणि इतर काही क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे.

यामधून लग्न आणि अंत्यसंस्कार यासारख्या घरातील कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे. हा आदेश 10 एप्रिलपासून लागू झाला असून 24 एप्रिलपर्यंत तो लागू राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचे एकत्र येणे, कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक, कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकरचा वापर, बँड वाजवणे आणि फटाके फोडण्यास मनाई आहे.'

असाच आदेश शहरात 8 एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, या आदेशात विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, स्मशानभूमी-दफनभूमीवर लोकांनी एकत्र येणे, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या बैठका यांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या हेतूने लोकांना एकत्र येण्यास परवानगी आहे. (हेही वाचा: COVID 19 In Mumbai: वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC चं साठीपार नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन)

यासह, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक हेतूंसाठी संमेलने आणि कारखाने, दुकाने व आस्थापनांमध्ये व्यापार, व्यवसाय अशा गोष्टींसाठी परवानगी दिली आहे. आदेशात पुढे म्हटले आहे की, या आदेशाची मुदत संपल्यानंतरही कोणतीही चौकशी किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत दंड, शिक्षा होऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif