Ganpati Visarjan 2024: महराष्ट्रात जय्यत तयारी सुरु, मुंबईचा लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठचे आज विसर्जन होणार; गणपती विजर्सनसाठी पोलिस सज्ज (Watch Video)
महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण जगभरात प्रसिध्द असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लालाबग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करत आज बाप्पाला शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण जगभरात प्रसिध्द असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लालाबग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आज विसर्जन मिरवणूकीच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. (हेही वाचा- लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीला सुरूवात, मुख्यद्वारावर भाविकांची तुफान गर्दी; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
मुंबईतच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आज गणपतीचे विसर्जन होणार आहे. पुणे शहरात आज भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी पुणे शहर पोलिस सज्ज झाले आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. नुकतीच लालबागच्या राजाची शेवटची आरती झाली आणि राजा मंडपातून निरोप देण्यासाठी निघाला. मुंबईचा लबलगाचा राजा, तेजुकाया, चिचपोकळीचा राजा, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती यासह अनेक गणेश उत्सव मंडळांचे आज विसर्जन होणार आहे. बाप्पाला निरोप देताना कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहे.
लालबागचा राजा
लालबागच्या राजाची मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मुंबईतील रस्त्यांवर गर्दी केली आहे. सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा पंडालमधून निघाला. बुधवारी पहाटे गिरगाव चौपाटीवर अंतिम मूर्तीचे विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
पुणे पोलिस मिरवणूकीसाठी सज्ज
राज्यात सुरक्षा वाढवली
मुंबईसह इतर शहरात राज्य राखीव पोलिस दल, जलद कृती दल, दंगल नियंत्रण दल, डेल्टा फोर्सही तैनात करण्यात आले आहे. जीवरक्षक आणि बचाव कार्य तैनात करण्यात आले आहे. बुडण्याची घटना टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले.