Maharashtra Monsoon Forecast Update 2019: मुंबई, ठाणे, पालघर रायगड येथे पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सप्टेंबर महिन्याचा शेवट होत आला आहे, तरीदेखील पाऊस थांबायचे नाव घेत नाही. महत्वाचे म्हणजे, अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून (Weather Deaprtment) गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सावध (Alert) राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. तसेच गरज असल्यास घराबाहेर पडा असेही सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडू की नये? असा प्रश्न नागरिकांच्या भोवती भिरत आहे. यातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा नागरीकांना सावधानीचा राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy Rain (Photo Credits-Twitter)

या वर्षीच्या पावसाने मुंबईकरांना (Mumbai) चांगलेच झोडपून काढले आहे. सप्टेंबर महिन्याचा शेवट होत आला आहे, तरीदेखील पाऊस थांबायचे नाव घेत नाही. महत्वाचे म्हणजे, अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून (Weather Deaprtment) गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सावध (Alert) राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. तसेच गरज असल्यास घराबाहेर पडा असेही सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडू की नये? असा प्रश्न नागरिकांच्या भोवती भिरत आहे. यातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा नागरीकांना सावधानीचा राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई पुढील 48 तास मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) होईल, अशी माहीती देण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीमुळे मुंबईकर काही धस्तावले आहेत.

या वर्षीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन सतत विस्कळीत होत आहे. याआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून सावरले नसताना पुन्हा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मुंबईकरांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rain: मुंबई, ठाणे आणि पालघर शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, आणि रायगड, या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच या चारही जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारपर्यंत मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif