Lok Sabha Election Results 2019: अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी पाडले भगदाड

अशोक चव्हाणांच्या बालेकिल्लाला भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी भगदाड पाडले

ashok chavan (Photo Credits: Newsstate)

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या नांदेड लोकसभा मतदारसंघात याआधी कधीही घडले नाही असं काही तरी भयानक घडलयं. कारण काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी मोठं भगदाड पाडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)  50 हजार मतांनी दणदणीत पराभव केलाय. अगदी मतदारसंघ स्थापनेपासून ते 2018 पर्यंत 3 लोकसभा निवडणुका वगळता हा मतदारसंघ काँग्रेसकडेच होता. त्यामुळे ह्या बालेकिल्ल्याला सुरुंग पाडणे हे प्रताप पाटील यांना म्हणावे तितके सोपे नव्हते. मात्र भाजपचे हे शिवधनुष्य त्यांनी अगदी यशस्वीरित्या पेलले असच चित्र ह्या निकालावरुन स्पष्ट दिसतय. हा पराभव अशोक चव्हाणांसाठी तसेच काँग्रेससाठी खूपच धक्कादायक आहे.

Lok Sabha Election Results 2019: लोकसभेच्या निकालाची पहिली फेरी काँग्रेससाठी ठरलीय धोक्याची घंटा, काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाही पिछाडीच्या यादीत समावेश

सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील यांच्या आघाडी-पिछाडीचा जणून लपंडावच सुरु होता. मात्र शेवटच्या फे-यांमध्ये अशोक चव्हाण पिछाडीवरच जाताना दिसले. त्यातूनच त्यांचा पराभव होईल अशी चर्चा रंगू लागली. अखेर अंतिम निकाल आला तो भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांच्या बाजूने. तब्बल 50 हजार मतांची आघाडी घेऊन त्यांनी काँग्रेसला चांगलीच धूळ चाखवलीय असच म्हणावं लागेल.

 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: भाजपा-शिवसेना युतीच्या विजयानंतर भाजपकडून मतदारांचे आभार

त्यामुळे आता पराभवाची जबाबदारी स्विकारून अशोक चव्हाण मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यताही वर्तवली जातेय. त्यामुळे आपल्या दारुण पराभवामुळे अशोक चव्हाण नेमकी काय भूमिका घेतील हे लवकरच कळेल. ताज्या अपडेट्ससाठी पाहात राहा लेटेस्टली मराठी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif