CM Eknath Shinde Khed Rally: एकनाथ शिंदे यांच्या खेड मधील रॅली पूर्वी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या निकटवर्तीय ठाकरे गटात

रामदास कदम आणि योगेश कदम या पिता पुत्रांच्या जोडीने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांनी आपल्याला राजकारणातून उध्वस्त करण्याचा मनसुबा आखल्याचा आरोप केला आहे.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमध्ये (Khed) आज मुख्यमंत्र्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या सभेला आज एकनाथ शिंदे सभेतून उत्तर देणार आणि कोकणात शक्तिप्रदर्शन करणार म्हणून या सभेकडे पाहिलं जात आहे. पण आज या सभेपूर्वी दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर (Prashant Pusalkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. प्रशांत पुसाळकर हे मागील काही दिवस योगेश कदम (Yogesh Kadam)  यांच्यासोबत होते पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचं ठरवलं आहे.

प्रशांत पुसाळकर यांनी संजय कदम यांच्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय हा शिंदे गटासाठि धक्का मानला जात आहे. पुसाळकर यांनी सुरूवातीला दापोली काँग्रेसचे युवक अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यानंतर ते काँग्रेस तालुका कार्यकारणीवर आले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या दापोली नगरमध्ये निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसला आव्हान दिलं. त्यावेळी ते आमदार योगेश कदम यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते.

दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी त्यांच्या सहकार्‍यांसोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी संजय कदम देखील तेथे उपस्थित होते. नक्की वाचा: Eknath Shinde Khed Rally: खेड मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेने काय उत्तर देणार? आमदार योगेश कदम यांच्याकडून टीझर जारी (Watch Video) .

रामदास कदम आणि योगेश कदम या पिता पुत्रांच्या जोडीने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांनी आपल्याला राजकारणातून उध्वस्त करण्याचा मनसुबा आखल्याचा आरोप केला आहे. यामध्ये अनिल परब एनसीपीला खेड मध्ये हाताशी घेऊन काम करत असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. आता आजच्या सभेची जबाबदारी देखील या पिता-पुत्रांकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील सभेला महाराष्ट्र भरातून लोकं आणून गर्दी जमवली होती पण आम्ही केवळ कोकणातून लोकं आणून ही सभा गाजवू असा दावा करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif