Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil: प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ठरले, थेट उमेदवार यादीच केली जाहीर

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात आज (27 मार्च) भेट झाली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी थेट वंचिततर्फे उमेदवारच जाहीर (VBA Candidate List Announce) केले. याशिवाय जरांगे पाटील आणि वंचीत यांच्यात सहयोग असेल असेही ते म्हणाले.

Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकासआघाडी यांचे जमणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात आज (27 मार्च) भेट झाली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी थेट वंचिततर्फे उमेदवारच जाहीर (VBA Candidate List Announce) केले. याशिवाय जरांगे पाटील आणि वंचीत यांच्यात सहयोग असेल असेही ते म्हणाले. त्यामुळे महाविकासआघाडीतून त्यांचा पक्ष बाहेर पडल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विद्यमान राजकारणात काहीही घडू शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अद्यापतरी कोण कोणासोबत आहे, याबाबत अर्थ लावणे कठीण आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या मागण्या आणि ताकद याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आम्ही परस्परांना सहयोग करणार आहोत. या निवडणुकीत आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम आणि प्रामुख्याने गरीब उमेदवारांना तिकीट देणार असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा असेल. आम्ही त्यांच्या संघटनेसोबत सहयोग करणार आहोत. मात्र, येत्या 30 तारखेपर्यंत थांबा, थोडा वेळ द्या असे त्यांनी आम्हाला सांगितल्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. (हेही वाचा, VBA first list of candidates from Maharashtra: वंचित ची पहिली यादी जाहीर; नागपूरात कॉंग्रेसला, सांगली मध्ये Prakash Shendage यांना पाठिंबा जाहीर)

महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले नसले तरी आपण स्वतंत्र लढणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या काही उमेदवारांची नावेही वाचून दाखवली. खास करुन आंबेडकर यांनी जाहीर केलेले उमेदवार अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, सांगली आणि भंडारा येथील जागांचा समावेश आहे. तर, नागपूर येथे वंचितने काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Prakash Ambedkar: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निरंतर चर्चा करावे असे व्यक्तीमत्व- संजय राऊत)

वंचित बहुजन आघाडी उमेदवार यादी

भंडारा गोंदिया- संजय केवत

गडचिरोली- चिमूर- हितेश मडावी

चंद्रपूर - राजेश बेल्ले

बुलढाणा- वसंत मगर

अकोला- प्रकाश आंबेडकर

अमरावती- कुमारी प्राजक्ता पिल्लेवान

वर्धा- राजेंद्र साळुंके

यवतमाळ वाशिम- खेमसिंग पवार

नागपूर- काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा

प्रकाश आंबेडकर यांनी पुनरुच्चार करत सांगितले की, या निवडणुकीत आम्ही गरीब आणि मागास उमेदवारांना प्राथान्याने तिकीट देणार आहोत. त्यांना निवडून आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. वंचित बहुजन आघाडी घराणेशाहीचा पूर्ण विरोध करते. त्यामुळे घराणेशाहीच्या विरोधातही वंचित आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे ते म्हणाले. वंचितच्या भूमिकेवर महाविकासआघाडी काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे.