Post Office And Mutual Fund Schemes Fraud: 75 जणांची पाच कोटी रुपयांची फसवणूक, मुंबईतील मालाड परिसरातील घटना

Vandana Chauhan and Manish Chauhan (Photo Credits: File Image)

पोस्ट ऑफिस (Post Office) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजनांमध्ये एफडीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका मुंबईतील जोडप्याने 75 जणांना 5 कोटी रुपयांचा गंडा (Post Office And Mutual Fund Schemes) घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार मालाड (Malad) येथे घडला आहे. या जोडप्याने पीडितांना त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्यांमधील म्युच्युअल फंड योजनांवर भरघोस परतावा देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मालाडच्या दिंडोशी परिसरात घडली.

मनीष चौहान (वय 50 वर्षे) आणि त्यांची पत्नी वंदना चौहान (वय 46वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही सध्या फरार आहेत. आरोपी मुंबईतील मालाड पूर्व भागातील रहिवासी आहेत. मिड-डेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 2018 मध्ये या जोडप्याने उर्वशी पटेल नावाच्या महिलेशी संपर्क साधला आणि तिला सांगितले की ते गेल्या 15 वर्षांपासून पोस्ट ऑफिसमध्ये काम करत आहेत.

आरोपींनी पटेल यांना 25,000 रुपयांच्या मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले. वंदनाजौहानने पीडितेला असेही सांगितले की ती आणि तिचा नवरा नियोनी इन्फ्रा (Niyoni Infra) आणि नियोनी वर्ल्ड ( Niyoni World) या दोन खाजगी कंपन्या त्यांच्या खासगी मालकीच्या आहेत. तिने पटेल यांना त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. वंदनाने पीडितेला पाच वर्षांसाठी 700 रुपये दरमहा गुंतवण्यास सांगितले आणि मॅच्युरिटी झाल्यावर 41,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा, Mumbai Fraud Case: बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत महिलेची 3.86 लाखांची फसवणूक)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वंदनाच्या सासूनेही या योजनेत लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, पटेल यांनी वंदना यांच्याकडे परतीसाठी संपर्क साधला असता तिने बहाणे सुरू केले. नंतर त्यांनी पटेल यांचे फोन उचलणेही बंद केले. 18 डिसेंबर रोजी, पटेल आणि राजू गोहिल नावाच्या आणखी एका पीडितेने, ज्याची आरोपींनी 1.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली.

एकूण प्रकाराबाबर पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.