Pornography Case मध्ये Mumbai Crime Branch करणार SIT द्वारा तपास; ACP-level officer करणार नेतृत्त्व

त्याच्या सोबतच पॉर्न फिल्म बनवण्याच्या प्रकरणामध्ये 11 जण पोलिस कोठडी मध्ये आहेत.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून आता पोर्नोग्राफी केस (Pornography Case) च्या पुढील तपासासाठी एका SITची स्थापना करण्यात येणार आहे. हा तपास SIT कडून होईल असं सांगण्यात आलं आहे. या एसआयटी टीमचं नेतृत्त्व एसीपी दर्जाचा पोलिस अधिकारी करणार आहे. दरम्यान पॉर्न केस प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा प्रमुख आरोपी आहे. पॉर्नोग्राफी बाबत इतर दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाचा तपास देखील आता यापुढे या नव्याने बनवण्यात आलेल्या एसआयटी कडेच असेल. या प्रकरणाचा अहवाल एसआयटी क्राईम ब्रांचच्या मुख्य अधिकार्‍यांना देणार आहे. Raj Kundra Pornography Case: राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ने प्रथमच Statement जारी करत व्यक्त केल्या भावना; पहा काय म्हणाली.

मुंबई मध्ये राज कुंद्राला क्राईम ब्रांच कडून 19 जुलैला अटक करण्यात आली आहे. त्याच्या सोबतच पॉर्न फिल्म बनवण्याच्या प्रकरणामध्ये 11 जण पोलिस कोठडी मध्ये आहेत. मागील शनिवारी राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा तातडीच्या सुटकेचा आणि पोलिस रिमांड विरूद्धची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच अभिनेत्री गहना वशिष्ठला देखील कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.

ANI Tweet

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची देखील चौकशी केली आहे. सध्या राज कुंद्राच्या पोलिस कोठडीमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर कुंद्रा पर आईपीसी कलम 420, 34 , 292 आणि 293 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. ही कलम फसवणूक आणि अश्लील कंटेंट शी निगडीत आहे.

राज कुंद्रा भारतामध्ये पॉर्न फिल्म शूट करून परदेशात ऑनलाईन अ‍ॅप वर प्रदर्शित करून पैसे कमावायचा असा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी काही अभिनेत्रींनी केलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif