विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार- नारायण राणे
विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे. भाजपाच्या महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरला" असे नारायण राणे म्हणाले
पूजा चव्हाण प्रकरण (Pooja Chavan Case) विरोधी पक्षासहित महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरल्याने अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र आता "संजय राठोड यांच्याविरोधात FIR दाखल करुन त्यांना अटक झाली पाहिजे" अशी मागणी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. Tv9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत आरोप झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला गेला हे पटण्यासारखे नाही. असेही ते म्हणाले. विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार. कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही असेही नारायण राणे म्हणाले. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण वेगळंच वळण घेऊ लागले आहे.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे. भाजपाच्या महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरला" असे नारायण राणे म्हणाले.हेदेखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
"राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. इथे कुंपणच शेत खातय" असा आरोप त्यांनी केला. "विरोधी पक्षाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला. संजय राठोड दोषी असून चौकशी झाली पाहिजे. " असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
दरम्यान "सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने दिली का? कोणती नवी शक्ती या नेत्यांना तुम्ही दिली," असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारला विचारला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.