Political Guru Purnima In Maharashtra: महाराष्ट्रात राजकीय गुरुपौर्णिमा, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला शिवसेना नेत्यांची भेट, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले

महाराष्ट्रात मात्र यंदा काहीशी राजकीय गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2022) साजरी होताना दिसत आहे. शिवसेना पक्षात गुरुपौर्णिमेला मोठे महत्त्व असते. केली अनेक वर्षे गुरुपौर्णिमा आणि मातोश्रीवरील गर्दी असे समिकरणच बनले गेले आहे. यंदा मात्र त्याला काहीशी फुटीची किनार बघायला मिळाली.

Balasaheb Thackeray, Anand Dighe | (Photo Credit: Archived, edited, representative images)

देशभरात आज गुरुपपौर्णिमा (Guru Purnima) मोठ्या प्रमणावर साजरी होत आहे. महाराष्ट्रात मात्र यंदा काहीशी राजकीय गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2022) साजरी होताना दिसत आहे. शिवसेना पक्षात गुरुपौर्णिमेला मोठे महत्त्व असते. केली अनेक वर्षे गुरुपौर्णिमा आणि मातोश्रीवरील गर्दी असे समिकरणच बनले गेले आहे. यंदा मात्र त्याला काहीशी फुटीची किनार बघायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि आपल्या समर्थक आमदारांसह त्यांनी वेगळा गट निर्माण केला. त्यामुळे मूळ शिवसेना नेते आणि शिवसैनिक आणि शिंदे गटातील नेते आणि शिवसैनिक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या स्मृती स्थळाला वेगवेगळी भेट दिली. आनंद दिघे यांचे कार्य केवळ ठाण्यापूरते मर्यादित असले तरी, एकनाथ शिंदे यांच्यामुळे त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांसह सुरुवातीला ठाणे येथील आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊनही त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. गुरुपौर्णिमेचे औच्यित्य साधत एकनाथ शिंदे यांनी हे अभिवादन केले. (हेही वाचा, Deepak Kesarkar On Shiv Sena: शिवसेना फुटीमागे प्रत्येक वेळी शरद पवार; दिपक केसरकर यांचा खळबळजन आरोप)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले खासदार राजन विचारे यांनीसुद्धा आज बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या वेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांपुढे प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले होते. मात्र, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी “गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास” अशी प्रतिक्रिया दिली. विचारे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा या प्रतिक्रियेनंतर सुरुझाली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरु आहेत. या दोघांनीही तळागाळापर्यंत शिवसेना नेऊन शेवटपर्यंत संघटनेसाठी काम केले असे विचारे या वेळी म्हणाले.