Police Recruitment: महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदं भरणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत माहिती दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश काल (28 डिसेंबर) संपले. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी ही माहिती दली.

Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदांची भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत माहिती दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) काल (28 डिसेंबर) संपले. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी ही माहिती दली. राज्यातील पोलीस दल आणि प्रशासन यांबाबत विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांदिलेल्या उत्तराधाकल गृहमंत्री विधिमंडळात बोलत होते. त्यांनी सांगितले की, राज्याच्या पोलीस दलाकडे मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे ही कमतरता भरुन काढण्यासाठी 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु केली जाईल. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाणार असल्याचेही वळसे पाटील यांनी म्हटले.

राज्य सरकारने अनेकदा अश्वासन देऊनही पोलीस भरती केली नसल्याकडे राज्याच्या गृहविभागाचे लक्ष वेधण्यात आले. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, दिवंगत आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना राज्य सरकारने 60 हजार पदांची पोलीस भरती करण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी टप्प्या टप्प्याने पोलीस भरती पार पडली. पहिल्या टप्प्यात 10 हजार उमेदवारांची पोलीस भरती झाली. उर्वरीत पोलीस भरती येत्या काही काळात केली जाईल, असेही वळसे पाटील म्हणाले. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Criticizes NCB: एनसीबीकडून महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे, ड्रग्स प्रकरणी मुख्यमंत्र्यानी एनसीबीवर डागली तोफ)

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार पोलीसांची भरती करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील पोलिसांकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे मंत्रिमंडळासमोर पोलीस भरतीसाठी माहिती देऊ. साधारण 50 हजार पदांची भरती करण्याबाबत निर्णय घेऊ, असे अश्वासनही वळसे पाटील यांनी दिले आहे. दरम्यान, सध्याची भरती पूर्ण झाल्यावरच पुढील भरती केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्य राखीव दलात 12 वर्षे काम केल्यानंततर पोलीस दलातील जवानांना महाराष्ट्र पोलीस दलातही सेवा देता येईल, असे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले. राज्य राखीव दलातील जवानांना ही संधी 10 वर्षांनीच द्यायचा राज्य सरकारचा विचारहोता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे तो निर्णय घेता आला नसल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. होमगार्डमध्ये काम करणाऱ्यांना वर्षामध्ये 180 दिवस काम देण्याचा प्रयत्न राहील, असंही गृहमंत्र्यांनी सांगितले.