मुंबई मधील साकीनाका परिसरातून 345 किलो गांजा जप्त; एकाला अटक

याप्रकरणी पोलिसांनी काल नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 अंतर्गत एकाला अटक केली आहे.

Police recovered over 345 kgs of ganja in Sakinaka | (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Sakinaka) येथून पोलिसांनी तब्बल 345 किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 अंतर्गत एकाला अटक केली आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक तीव्रतेने होऊ लागला. त्यानंतर त्या संबंधित अनेक व्यक्तींची NCB कडून चौकशी करण्यात आली. तर अद्याप धाडसत्र सुरुच आहेत. या प्रकरणाचे वेगवेगळे एंग्लस समोर येत असून हे जाळे विस्तारले असल्याचे लक्षात येते. (Drugs Case In Mumbai: जावई Sameer Khan च्या अटकेनंतर Nawab Malik यांची पहिली प्रतिक्रिया)

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट 1985 हा एनडीपीएस कायदा म्हणून ओळखला जातो. हा भारतीय संविधानातील एक अधिनियम आहे. एखादे मादक औषध किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ यांची लागवड, उत्पादन, मालकी, विक्री, खरेदी, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन यास प्रतिबंधात्मक असा हा कायदा आहे. (Drug Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुच्छड पानवालाचे मालक रामकुमार तिवारी याला मिळाला जामीन)

ANI Tweet:

सध्या राज्यात ड्रग्स प्रकरणं गाजत आहे. ड्रग्य प्रकरणात एनसीपी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी प्रसिद्ध मुच्छड पानवाला चे मालक राजकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची बहिण कोमल रामपाल हिची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, मुंबईतील दोन ठिकाणी एनसीबीकडून धाड टाकण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीची प्रतिक्षा आहे.