PMFBY: शेतकऱ्यांनो 31 जुलै शेवटची तारीख; पंतप्रधान पीक विमा योजना लाभासाठी त्वरीत नोंदणी करा
नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही झाले तरी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग स्वीकारु नये त्यासाठी त्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा, असा या योजनेचा हेतू आहे.
PM Fasal Bima Yojana: दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ असो की गारपीट. देशभरातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मोठी मदत करते. त्यामुळे यंदाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशी नोंद करावी लागणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारख ही 31 जुलै आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . अशा शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 अखेर नोंदणी करायची आहे.
काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना?
नैसर्गीक संकटामुळे ओढावलेल्या परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट किंवा तशाच प्रकारचे कोणते संकट आल्यास शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाते. नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही झाले तरी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग स्वीकारु नये त्यासाठी त्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा, असा या योजनेचा हेतू आहे.
शेतकऱ्याला विमा निवडीचा अधिकार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे असे शेतकरी अद्यापही या योजनेशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे या योजनेसाठी नोंदणी करण्याची आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या योजनेच्या निकषांनुसार आतापर्यंत हप्त्याच्या रुपात (प्रीमियम) ठेवण्यात आलेली रक्कम 2% (खरीप पिकांसाठी) आणि 1.5% रब्बी पिकांसाठी देण्याचे प्रावधान आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकता आणि निवडीनुसार विमा घेण्येची मुभा आहे. (हेही वाचा, Kharif Crop Season 2020: महाराष्ट्राने मागितले त्यापेक्षा केंद्राने कमीच दिले, केवळ 40 लाख मेट्रिक टन खतास मंजूरी)
आवश्यक कागदपत्रं
आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र, याशिवाय पत्त्यासाठीही या पैकीच एखादे कागदपत्र आपण वापरु शकता.
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी बँकेत जाऊन आपण अर्ज करु शकता. याशिवाय हाच अर्ज आपण ऑनलाइनही करु शकता. त्यासाठी https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळावर आपण नोंदणी करु शकता. जर आपण पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी फॉर्म ऑफलाइन भरुन नोंदणी करु इच्छित असाल तर नजिकच्या राष्ट्रीयिकृत बँकेत जाऊनही आपण या विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2020 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

