नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे- भिंवडी-कल्याण मेट्रो आणि दहिसर- मीरा रोड भाईंदर मेट्रो प्रोजेक्टचं भूमिपूजन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो 5 आणि मेट्रो 9, चा शिलान्यास,पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत CIDCO Housing Scheme चं लोकार्पण केलं आहे.
PM Narendra Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज एकदिवसीय महाराष्ट्र दौर्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो 5 आणि मेट्रो 9, चा शिलान्यास/भूमिपूजन ,पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत CIDCO Housing Scheme चं भूमिपूजन. केलं आहे. यामध्ये ठाणे- भिंवडी-कल्याण मेट्रो (Thane-Bhiwandi-Kalyan metro) आणि दहिसर- मीरा रोड भाईंदर (Dahisar-Mira Bhayander metro ) या मेट्रोचं भूमिपूजन. मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांनी कल्याण येथील कार्यक्रमात मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मुंबई, ठाणे भागात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम होतो. वाहतुक ही शहरीकरणाला वेग देणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मुंबई लोकल सोबतच वाहतुकीसाठी मुंबई आणि ठाणेकरांना मेट्रोची सुविधा अत्यावश्यक असल्याचं मोदींनी सांगितलं. भविष्यात मेट्रो सेवेचं विस्तारीकरण होणार असल्याच मोदींनी सांगितलं आहे.
सामान्य मुंबईकरांना 2022 सालपर्यंत जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहेत तो पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 90,000 नवी घरं बांधली जाणार आहेत. तीन वर्षांमध्ये ही घरं बांधून पूर्ण होणार आहेत. त्यासाठी अडीच लाखापर्यंत सरकार मदत करणार आहे.
आज सकाळी राज भवनामध्ये नरेंद्र मोदींनी ‘Timeless LAXMAN' पुस्तकाचं अनावरण केलं आहे. मुंबईनंतर संध्याकाळी नरेंद्र मोदी पुण्यात जाऊन मेट्रोच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करणार आहेत.