Narendra Modi: पूरसंकटात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठीतून ट्विट
राज्यात आतापर्यंत जवळपास 50 जणांचा या संकटाने बळी घेतला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांवर अतिवृष्टी आणि पुराचे संकट कोसळले आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास 50 जणांचा या संकटाने बळी घेतला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले, अशा आशयाचे नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे ट्विट मराठीतून केले आहे.
पश्चिम विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरामुळे 23 हजारांपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे 21 हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 57 हजार 354 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, सोयाबीन, भात कापूस, तूर, भाजीपाला, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, तब्बल 513 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- LPG Cylinder Rules: 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलिंडरच्या वितरणाचे नियम बदलणार, 'या' शहरांमध्ये OPT शिवाय मिळणार नाही गॅस सिलिंडर; जाणून घ्या
नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-
महाराष्ट्रासह तेलंगणातही मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिमुळे मृतांची संख्या 50 वर गेली आहे. 15 ऑक्टोबरला हैदराबादच्या काही भागांत पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पाणी साचले होते. तसेच रामनथापूर आणि अंबरपेटसह अनेक भागात सामान्य जनजीवनावर परिणाम झाला आहे.