जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन

कोरोना व्हायरसची लागण होऊन भारतात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 हून अधिक रुग्ण कोरोना बाधीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 22 मार्चला जनता कर्फ्यूचे (Janata Curfew) पालन करण्याचे आवाहन केले होते

File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन भारतात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 हून अधिक रुग्ण कोरोना बाधीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 22 मार्चला जनता कर्फ्यूचे (Janata Curfew) पालन करण्याचे आवाहन केले होते. "लोकांनी येत्या रविवारी 22 मार्चला स्वत:हून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल", असे मोदी म्हणाले होते. मोदींच्या आवाहनाला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर मोदींनी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे (Social Distance) आवाहन केले आहे. जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाल्यानंतर नागरिक सोशल डिस्टंसिंगचेही पालन करतील अशी अपेक्षा केली जात आहे.

करोना विषाणूच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशाने एका मनाने धन्यवाद दिलेत. यासाठी देशवासियांचे खूप खूप आभार, अशा शब्दांत मोदींनी जनतेचे आभारही मानले आहेत. दरम्यान मोदी ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले की, “हा धन्यवादचा नाद आहे. त्याचबरोबर एका मोठ्या लढाईला सुरुवात करण्याचा हा शंखनादही आहे. याच संकल्पासोबत याच वेळेपासून एका मोठ्या लढाईसाठी आपण स्वतःला बंधनात बांधून घेऊयात” हे देखील वाचा- फ्रांसच्या संशोधकांची कोरोना व्हायरसच्या औषधाची यशस्वी चाचणी; सहा दिवसांत विषाणूचे संक्रमण थांबवणे शक्य

नरेंद्र मोदी यांचे ट्विट-

जनता कर्फ्यूदरम्यान संध्याकाळी मुंबईसह राज्यातील नागरिकांनी करोनाशी लढा देणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे शंख, टाळ्या आणि थाळीनाद करून आभार मानले. जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणाऱ्या महाराष्ट्रवासियांचे आभार व्यक्त करतानाच, जनता कर्फ्यूत उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर केला.