पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, सोलापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करणार; जाणून घ्या कार्यक्रम
विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकासमंत्री हरजितसिंग गिरी हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Modi ) आज (बुधवार, 9 जानेवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर येथील विविध विकासकामांचे (Various Developmental Projects in Solapur) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) हेसुद्धा आजच मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दौऱ्याचाच दिवश ठरला आहे. दरम्यान, देहू-आळंदी पालखी मार्ग, 30 हजार घरकुलांची पायाभरणी, स्मार्ट सिटी, ड्रेनेज योजना अशा विविध उपक्रमांचे पंतप्रधान मोदी शुभारंभ करतील. याच वेळी पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी बिगूल वाजवले जाण्याचीही शक्यता आहे.
कसा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
- सकाळी 10.50 बिदरहून सोलापूर विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन
- पार्क स्टेडियम येथे इलेक्ट्रॉनिक बटण दाबून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
- पंतप्रधान एकाच वेळी 6 विकासकामांचा शुभारंभ करतील. तसेच, उपस्थितांशी सवाद साधतील.
- दुपारी 12.15 - बविदरकडे हेलिकॉप्टरने रवाना
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केल्या जाणाऱ्या योजना
-
- उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी भूमिपूजन (खर्च 360 कोटी रुपये)
- एबीडी एरियातील पाणीपुरवडा ड्रेनेज लाईन सुविधा प्रकल्प भूमिपूजन (खर्च 190 कोटी रुपये )
- पालिका हद्दवाढ परिसरातील भुयारी गटार योजना प्रकल्प भूमिपूजन (खर्च 180 कोटी रुपये)
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लोकार्पण
- पंतप्रधान गृहयोजना लाभार्थी रे नगर फेडरेशन नियोजित 30 गृहप्रकल्पांचे भूमिपूजन
- सोलापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
(हेही वाचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा; पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रत्युत्तर?)
प्राप्त माहितीनुसार, राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकासमंत्री हरजितसिंग गिरी हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.