PM-Kisan Samman Nidhi चा 16 वा हप्ता जारी; तुम्हांला मिळाला का? असं तपासा!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही देखील लाभार्थी असाल तर पहा तुमच्या खात्यामध्ये हा योजनेचा 16 वा हप्ता आला आहे की नाही? कसं घ्याल जाणून?

Farmer | Pixabay.com

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेचा 16 वा हप्ता जारी करत असल्याची घोषणा काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यवतमाळ दौर्‍यावर असताना एका सभेला संबोधताना केली आहे. 28 फेब्रुवारीपासून PM किसानच्या 16 वा हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून हा हप्ता कधी मिळणार याची चर्चा होती अखेर मोदींनी काल शेतकरी वर्गाला ही खुषखबर दिली. नोव्हेंबर 2023 मध्ये 15 व्या हप्त्यानंतर आता 16 व्या हप्त्याचे 21 हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आली आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही देखील लाभार्थी असाल तर पहा तुमच्या खात्यामध्ये हा योजनेचा 16 वा हप्ता आला आहे की नाही? सामान्यपणे आर्थिक व्यवहारांची माहिती मेसेज द्वारा बॅंकेकडून दिली जाते. पण जर मेसेज आला नसेल तर पहा कशी जाणून घ्याल ही माहिती?

पैसे जमा नसल्यास ही कारणं असू शकतील!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी आणि योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती दिली असल्यास तुमचा हप्ता जमा झालेला नसेल. शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधून तुम्ही माहिती मिळवू शकाल. PM किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करून तक्रार देखील नोंदवता येईल. PM Modi Yavatmal Visit: यवतमाळ मध्ये PM Narendra Modi यांच्या हस्ते 4900 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण (Watch Video) .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्रच राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये मिळणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif