Pimpri Chinchwad Traffic Advisory: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील वाहतूक व्यवस्थेतील बदल इथे पहा थेट Google Map वर!
पण अशात तुमची गैरसोय होऊ नये म्हणून हे ट्राफिक अपडेट्स तुम्ही नक्की जवळ ठेवा.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी वारकरी सज्ज झाले आहेत. आज 28 जून पासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा (Sant Tukaram Maharaj Palkhi) प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू होत आहे तर 29 जून पासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा ( Sant Dyaneshwar Maharaj Palkhi) प्रवास सुरू होणार आहे. यंदा 17 जुलै दिवशी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी करण्याकरिता या दोन्ही पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. मात्र जे भाविक वारी सोबत पंढरपूरला जाऊ शकत नाही ते अनेकजण वाटेतच या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतं. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या भागात पालखींच्या वेळापत्रकानुसार वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले जातात. यंदा देखील पालखीचा मार्ग पाहून काही रोड वाहतूकीसाठी त्या विशिष्ट दिवशी बंद ठेवले जातील आणि काही मार्गांवर ट्राफिक वळवण्यात आले आहे. ट्राफिक पोलिसांकडून त्याची माहिती देण्यात आली आहे. मग पहा थेट गूगल मॅप वर नेमका कधी कोणता मार्ग बंद असेल आणि कुठे वाहतूक वळवण्यात आली आहे.
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे सहाजिकच त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर येत असतो. पण अशात तुमची गैरसोय होऊ नये म्हणून हे ट्राफिक अपडेट्स तुम्ही नक्की जवळ ठेवा. Pandharpur Ashadhi Wari 2024: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान; विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती, पूजा संपन्न (Watch Video).
पिंपरी चिंचवड मधील वाहतूक व्यवस्थेमधील बदल
या मॅप मध्ये निळी मार्गिका हा पालखीचा मार्ग असेल. लाल मार्गिका ज्यावर वाहतूक बंद केलेली आहे तर हिरवी मार्गिका वाहतूक वळवण्यात आल्याचं निर्देशित करत आहे. नक्की वाचा: Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा 28 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक!
ट्राफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून मार्गक्रमण करून सोमवारी सकाळी पुण्याकडे प्रयाण करेल तर रविवारी रात्री आळंदीतील गांधी वाडा येथे नियोजित मुक्काम असेल.