पिंपरी चिंचवड मध्ये सार्वजनिक ठिकाणी बंदी असलेल्या अंमली पदार्थांचे सेवन करताना 20 जणांना अटक

पिंपरी-चिंचवड भागात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी बॅन असलेले हा अंमली पदार्थ यांचे सेवन करणार्‍या 20 जणांना विविध ठिकाणावरून एका दिवसात ताब्यात घेतले आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये मागील 6-8 महिन्यांपासून ड्रग्स रॅकेट प्रकरणी अनेक ठिकाणी धाडी टाकत कारवाई सुरू असताना काल (18 मार्च) पुण्याजवळ पिंपरी-चिंचवड भागात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी बॅन असलेले हा अंमली पदार्थ यांचे सेवन करणार्‍या 20 जणांना विविध ठिकाणावरून एका दिवसात ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करून ही ताब्यात घेतलेली मंडळी सार्वजनिक ठिकाणी हंगामा करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस कमिशनर कृष्णा प्रकाश यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून anti narcotics cell ने बालाजी सोनटक्के यांच्या नेतृत्त्वाखाली विविध ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये 8 ठिकाणी घातलेल्या धाडीत सार्वजनिक ठिकाणी काही जण अंमली पदार्थचे सेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. असे वृत्त TheIndianExpres ने दिले आहे. महाराष्ट्र: नवी मुंबई परिसरात NCB ने टाकलेल्या छाप्यात एका नायजेरियन ड्रग्ज पेडलरला अटक.

पिंपरी चिंचवड प्रमाणे काल पुण्यातही सिटी पोलिसांनी 22 किलो marijuana नामक ड्रग्स घेऊन जाणार्‍या मोटारसायकलिस्टला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल Gangadham – Shatrunjay Roadवर करण्यात आली आहे.

मागील वर्षी 20 किलो Mephedrone हे देखील बंदी असलेले ड्र्ग्स ताब्यात घेण्यात आले होते. या ड्र्ग्सची किंमत 20 कोटी होती. तर या प्रकरामध्ये 5 जणांना अटक देखील झाली होती.