पिंपरी-चिंचवड येथे नराधमांकडून 13 वर्षीय मुलीचा विनयभंग
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालेले असून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालेले असून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन नराधमांनी तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींनी पळ काढला आहे. तर पोलिसांकडून अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
निगडी परिसरातील ही घटना असून पीडित मुलगी एका दुकानात प्रोजेक्टसाठी काही पेपर्स आणण्यासाठी गेली होती. पेपर्स घेऊन झाल्यावर परत येत असताना तीन नराधमांनी तिला अचानक रिक्षात ओढले. यावर मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंक करत चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिले. या प्रकरणी मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला असता त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार घेऊन घेतल्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्ह दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता यामधील एकाला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.(नाशिक: लग्नाला नकार दिल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले; लासलगाव जळीत कांडातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल)
तर शनिवारी हैदराबाद येथे प्रेमाला नकार दिल्याने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. तसेच नराधमाने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिला जाळले आहे. यामध्ये सदर पीडित मुलगी 50 टक्के भाजली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात एकटी असताना घरात घुसुन हे कृत्य केले आहे. मुलीने आराडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली.
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2020 09:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

