Pimpri-Chinchwad: डोक्यात गोळी लागली; ​पिंपरी- चिंचवड येथे भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू

वडीलाच्या परवाना असलेल्या पिस्तूलातून सुटलेल्या गोळीने प्रसन्न याचा मृत्यू झाला. चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथील रस्त्यावर चौपाटी चौक आहे. या चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे कुटुंब एकत्र राहते.

Pistol | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील भाजप नगरसेविका ( BJP Corporator) करुणा चिंचवडे (Karuna Chinchwade) यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. डोक्यात पिस्तुलाची गोळी लागल्याने हा मृत्यू झाला. प्रसन्न चिंचवडे (Prasanna Chinchwade) असे या मुलाचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. रविवारी (28 मार्च) रात्री 9.15 वाजनेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी अवस्थेत असलेल्या प्रसन्न याला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे निधन झाले. हसतमूख, मनमिळावू असलेल्या प्रसन्न याचा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, पिस्तूलाची गोळी चुकून लागाली की त्याने आत्महत्या केली याबाबत तपास सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरीच हा प्रकार घडला. वडीलाच्या परवाना असलेल्या पिस्तूलातून सुटलेल्या गोळीने प्रसन्न याचा मृत्यू झाला. चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथील रस्त्यावर चौपाटी चौक आहे. या चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे कुटुंब एकत्र राहते. (हेही वाचा, Deepali Chavan Suicide: वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, पिस्तूलातून स्वत:वर झाडली गोळी)

दरम्यान, रविवारी रात्री सव्वानऊ वाजणेच्या सुमारास प्रसन्न याने घरातील सर्वांबरोबर जेवण केले. त्यानंतर तो आपल्या वरच्या खोलीत गेला. त्या वेळी अचानक बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाज एकून सर्वच जण प्रसन्न याच्या खोलीकडे धावले. समोर प्रसन्न रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून गोळी सुटली होती.

प्रसन्न याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती कळताच परिसरातील लोकांनी चिंचवडे याच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती.