Palghar Road Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन रस्त्यातच उलटली; 27 जखमी, 10 जणांची प्रकृती गंभीर

लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन उलटल्याने भीषण दुर्घटना (Road Accident) घडली आहे.

Palghar Road Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन रस्त्यातच उलटली; 27 जखमी, 10 जणांची प्रकृती गंभीर
Accident Representational image (PC - PTI)

लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन उलटल्याने भीषण दुर्घटना (Road Accident) घडली आहे. पालघरच्या (Palghar) डहाणू-जव्हार दरम्यान सारणी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात 27 जण जखमी झाले आहेत. तर, 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे वऱ्हाड सरणी डोंगरपाडा येथून तलावली येथे लग्नासाठी चालले होते. मात्र, डहाणू- जव्हार राज्य मार्गावरील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही व्हॅन पलटी झाली. त्यावेळी व्हॅनमधील सर्वजण बाहेर फेकले गेले त्यामुळे गंभीर इजा झाल्या आहेत. त्यानंतर 27 जखमींपैकी 17 जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, काही जखमींना सिल्वासा व ठाणे येथे हलवण्यात आले आहे. हे देखील वाचा- Pune Nagar Highway Close on 1st January: कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे-नगर महामार्ग प्रवाशांसाठी 1 जानेवारीला राहणार बंद

दरम्यान, घटनेची माहिती कळताच डहाणूचे उपसभापती पिंटू गहला आणि त्या भागातील काही स्थानिक घटनास्थळी पोहचले. तसेच जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.

याआधी शुक्रवारी नागपुरातील मिहान परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. या अपघातात एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर, एक जण जखमी झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2020 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).