High Court On Lust Vs. Love: 'प्रेमातील शारीरिक संबंध वासना नव्हे', मुंबई हायकोर्टाकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
ज्यामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, प्रेमात (Love) असलेल्या जोडप्याने ठेवलेले शरीरीक संबंध (Physical Relationship) म्हणजे वासना (Lust) नव्हे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Bombay High Court) बलात्कार प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना एक महत्त्वाचे मत नोंदवले आहे. ज्यामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, प्रेमात (Love) असलेल्या जोडप्याने ठेवलेले शरीरीक संबंध (Physical Relationship) म्हणजे वासना (Lust) नव्हे. त्यामुळे आरोपीला त्याने बलात्कार केला असे म्हणता येणार नाही. कोर्टाने या निरीक्षणासोबत 26 वर्षीय आरोपीला जामीनही मंजूर केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीवर 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीला जामीन मंजूर करताना त्यांच्यातील कथीत शारीरिक संबंध वासनेतून नव्हे तर प्रेमातूनच झाल्यावर अधिक जोर दिला.
आरोपीला जामीन मंजूर
नितीन ढाबेराव असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन दाखल गुन्ह्यात कोर्टाकडून त्याला जामीन मिळाला आहे. न्यायाधीश उर्मिला जोशी पालेकर यांनी नोंदवले की, पीडित मुलगी ही स्वत:हून घरातून बाहेर पडली होती. आणि तिचा प्रियकर असलेला आरोपीही नुकताच अल्पवयीन गटातून बाहेर पडला होता. केवळ प्रेमाच्या नात्यातून ते एकत्र आले होते. (हेही वाचा, Sexual Relationship Out Of Love: 'लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला जामीन मंजूर)
कोर्टाने पुढे असेही निरीक्षण नोंदवले की, अर्जदाराचे वयही 26 वर्षे आहे. दोघेही प्रेम प्रकरणातून एकत्र आले होते. तरुणांमध्ये प्रेमातून जे आकर्षण निर्माण होते त्यातूनच हे दोघेही एकत्र आले होते. प्रेमातून निर्माण झालेल्या शरीरसंबंधांना वासना म्हणता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाला लैंगिक अत्याचाराच्या कक्षेतून पाहता येणार नाही. (हेही वाचा, Bihar Shocker: मुझफ्फरपूरमध्ये प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात; मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून कापला प्रायव्हेट पार्ट)
नेमके प्रकरण काय?
नितीन दाभेराव याचयावर पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. पीडित मुलगी ही 23 ऑगस्ट 2020 च्या दिवशी घरातून पुस्तके आणण्याच्या निमित्ताने बाहेर गेली होती. मात्र, ती परतली नाही. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला शोधून काढले. या वेळी पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने सांगितले की, आरोपी आणि आपण रोमॅंटीक संबंधात म्हणजेच प्रेमसंबंधात आहोत. त्याच्याशी विवाह करण्याच्या उद्देशान आपण घरातून दागिणे, कपडे आणि इतर साहित्य घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर आपण राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी थांबलो. (हेही वाचा, Love Story: बिझनेस टायकूनच्या मुलीने प्रियकराशी लग्न करण्यासाठी सोडली 2,484 कोटी रुपयांची संपत्ती, जाणून घ्या सविस्तर)
आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायाधीश जोशी फडके यांनी नोंदवले की, जोपर्यंत योग्यतेचा संबंध आहो तोपर्यंत पाहता, हे मान्य आहे की, पीडितेचे वय 13 वर्षे आहे. त्यामुळे शरीरसंबंधांसाठी तिची परवानगी आहे किंवा नाही हे महत्त्वाचे ठरत नाही. पण, असे असले तरी, तिचे आरोपीवर प्रेम आहे. त्याने तशी कबुली दिली आहे. कोर्टानेही अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला ज्यात तिने म्हटले आहे की, आपण स्वत:हून एकटे त्याच्यासोबत गेली. त्याने कधीही त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. उलट ती स्वत:हूनच त्याच्यासोबत गेली. दोघेही लग्न करणार होते.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम कलम 363, 376, 376(2)(एन), 376(3) आणि 34 तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 4,6 आणि 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.