Phalodi Satta Bazar Prediction: महाविकासआघाडी की महायुती? राज्यात कोणाची सत्ता? फलोदी सट्टा बाजार अंदाज काय? घ्या जाणून

दरम्यान, महाविकासआघाडीला नेमक्या किती जागा मिळतील याबाबत मात्र या बाजाराने निश्चित असे भाष्य केल्याचे पाहायला मिळत नाही.

Phalodi Satta Bazar | (Photo credit: archived, edited, representative image)

Phalodi Satta Bazar Maharashtra Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी सुरु असलेल्या प्रचाराची सांगता झाली. आता केवळ उत्सुकता मतदानाच्या दिवसाची आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीची. दरम्यान, या मतमोजणीनंतर कोणाचे सरकार सत्तेवर येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, सट्टा बाजार काय म्हणतो याकडेही अनेकांचे लक्ष असते. या पार्श्वभूमीवर तून (Phalodi Satta Bazar) एक महत्त्वाचा अंदाज पुढे आला आहे. जो सांगतो आहे की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सत्तेत येऊ शकते. तर महाविकासआघाडीस (Maha Vikas Aghadi) विरोधात बसावे लागू शकते. अर्थात हे केवळ अंदाज असतात, ते खरे ठरतातच असे नाही. या आधी अनेक वेळा हे अंदाज चुकीचेही ठरले आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत सट्टा बाजार फेल

फलोदी सट्टा बाजारने हरियाणा विधानसभा निवडणुकीत या बाजाराने वर्तवलेला अंदाज खरा ठरला नव्हता. हा अंदाज सांगतो की, एकटा भाजप 87 ते 90 जागा मिळवू शकतो, महायुती 288 पकी 144 ते 152 जागा मिळवू शकते. महाराष्ट्रातील बहुमताचा आकडा विचारात घेता तो 145 आहे. त्यामुळे या अंदाजाचे भाकीत विचारात घेता महायुती सरकार बनवू शकते असे दिसते. पण, महाविकासआघाडी किती जागा मिळवू शकते याबाबत मात्र हा अंदाज निश्चित भाष्य करत नाही. त्यामुळे या वेळीही या बाजाराने वर्तवलेला अंदाज खरा ठरणार की खोटा? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान,  सट्टा बाजार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर झारखंड विधानसभा निवडणूक 2024 बाबतही अंदाज वर्तवतो. बाजाराच्या अंदाजात महायुतीवर 40 पैसे तर महाविकासआघाडीवर 2 ते 2.50 रुपये इतका भाव लावला जात असल्याचे, वृत्त एबीपी माझाने दिले आहे. (हेही वाचा, Pratibha Pawar: शरद पवार यांच्या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावले बॅनर; बारामती मतदारसंघासह राज्यभर चर्चा)

झारखंड निवडणुकीतही फलोदी बाजाराचा अंदाज

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप चक्क 55 जागा जिंकेल असा अंदाज फलोदी सट्टा बाजार वर्तवतो. त्यामुळे या राज्यात भाजप एकहाती सत्ता मिळवण्याची तीव्र शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधानसभेत एकूण जागा 81 आहेत. त्यापैकी 55 जागा जिंकणारा पक्ष सहज सत्ता स्थापन करु शकतो. मात्र, जनतेच्या मनात काय हे प्रत्यक्षात 23 नोव्हेंर रोजीच समजू शकणार आहे. (हेही वाचा, Disawar Satta King Result: Disawar Jodi Chart म्हणजे काय? याबाबतची संपूर्ण माहिती घ्या जाणून)

राज्य विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानासाठी आयोगाकडून सर्व तयारी झाली आहे. आता प्रतिक्षा आहे तो उद्याचा दिवस उजाडण्याची. उद्या म्हमजेच 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. राज्यातील मतदार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात करतील. मतदरांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 1 लाख 427 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवरुन तब्बल 9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



संबंधित बातम्या