Petrol Dealers Strike: महाराष्ट्रात 31 मे दिवशी पेट्रोल पंप डीलर्सचा संप; 'या' मागणीसाठी आक्रमक
महाराष्ट्र सह हा संप तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बंगालच्या काही भागांत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार सह काही राज्यांमध्ये पेट्रोल पंप मालक संपात सहभागी असतील.
केंद्र सरकारने महागाई मध्ये होरपळत असलेल्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पेट्रोल,डिझेलचे दर कमी केले आहेत. पण यामुळे पेट्रोलपंप धारकांना फटका बसल्याने त्यांनी 31 मे दिवशी संप पुकारला आहे. डिलर्स कडून कमिशन/ मार्जिन मध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. यासाठीच ते संपावर जाणार आहेत. डिलर्स संपाच्या दिवशी पेट्रोल, डिझेलची खरेदी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
डिलर्सच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कमिशन मध्ये 2017 नंतर कोणतीही वाढ झालेली नाही. रातोरात इंधनदर कमी केल्याने पेट्रोल पंप धारकांना आर्थिक फटका बसला आहे. जास्त किंमतीने स्टॉक विकत घेतल्यानंतर आता कमी दरात विकावा लागत असल्याने त्यांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संपाच्या दरम्यान खुले राहणार पेट्रोल पंप
केंद्र सरकार कडून पेट्रोल 8 रूपये तर डिझेल 6 रूपयांनी कमी केले आहे. अबकारी कर कमी केल्याने ग्राहकांना फायदा झाला आहे. पण यावरून संपाची घोषणा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोलपंप धारकांच्या संपाचा सामान्यांना फटका बसणार नाही. सारे पेट्रोलपंप खुले राहणार आहेत. पेट्रोल पंप डीलर असोसिएशन चे सदस्य चेतन मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन भारत भर होणार आहे. तेल विक्री करणार्या कंपन्यांविरूद्ध पेट्रोलपंप मालक आपला विरोध दर्शवणार अहेत. इथे जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल किंमती आणि डिझेल किंमती .
महाराष्ट्र सह हा संप तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बंगालच्या काही भागांत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार सह काही राज्यांमध्ये पेट्रोल पंप मालक संपात सहभागी असतील.