पेट्रोलच्या दरात वाढ, मुंबईत 80.01 रुपये प्रतिलीटर झाल्याने चालकांमध्ये नाराजी

तर मुंबईत सात आठवड्यानंतर परत पेट्रोलचे दर वाढल्याने ते आता 80.01 रुपये प्रतिलीटर झाले आहे. या वाढलेल्या दरामुळे चालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर मुंबईत सात आठवड्यानंतर परत पेट्रोलचे दर वाढल्याने ते आता 80.01 रुपये प्रतिलीटर झाले आहे. या वाढलेल्या दरामुळे चालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दिल्ली, कोलकाता,मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोलचे दर 15-16 पैसे प्रति लीटर झाले आहेत. तर डीझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबासाईटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलचे दर क्रमश: 74.33 रुपये, 77.04 रुपये, 80.01 रुपये आणि 77.29 रुपये प्रति लीटर झाले आहेत.

शुक्रवारी पेट्रोल ऑईलच्या मार्केटिंग कंपन्यांनी शुक्रवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता येथे पेट्रोलचे दर 15 पैसे आणि चेन्नई येथे 16 पैशांनी वाढ केली आहे. मुंबईत यापूर्वी 3 ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलचा भाव 80.01 रुपये प्रतीलिटर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात दोन दिवस वाढ झाल्यानंतर कारभार मंदगतीने सुरु होता. सध्या कच्चे तेल ब्रेंट क्रूडचे दाम 63 डॉलर प्रति बॅरल पेक्षा अधिक आहे.(वन रुपी क्लिनीकच्या मदतीने महिलेची पनवेल रेल्वे स्थानकावर सुखरुप प्रस्तुती)

 आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) वर ब्रेंट क्रूडचा जानेवारी करार शुक्रवारी मागील सत्राच्या तुलनेत 0.6 टक्क्यांनी कमी होऊन 63.61 डॉलर प्रति बॅरलवर होता. त्याच वेळी अमेरिकन लाईट क्रूड मागील सत्रच्या तुलनेत 0.67 टक्क्यांनी कमी होऊन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या जानेवारीत झालेल्या करारामध्ये 58.19 डॉलर प्रति बॅरलवर होता.