Petrol-Diesel Today Rate: मुंबई, पुणे, नाशिक सह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात काय आहेत पेट्रोल-डिझेल चे आजचे दर

नवीन दरानुसार मुंबईत आज पेट्रोलचा दर 78.91 रुपये तर डिझेलचा दर 68.79 रुपये प्रतिलीटर आहे.

पेट्रोल, डिझेल Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 30 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असला तरीही अनलॉक 1 देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे हळूहळू वाहतूक सेवा, आवश्यक सुविधा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे कच्या तेलाच्या (Crude Oil) किंमती वाढल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्या तेलाच्या बॅरलमागील किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. तसेच याआधी काही राज्य सरकारांनी महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटच्या दरात वाढ केली होती.

नवीन दरानुसार मुंबईत आज पेट्रोलचा दर 78.91 रुपये तर डिझेलचा दर 68.79 रुपये प्रतिलीटर आहे. पेट्रोल-डिझेल महागले, प्रति लिटर 60 पैशांची वाढ; 'हे' आहेत नवीन दर

पाहूया मुंबई व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

पुणे- पेट्रोल 78.64 तर डिझेल 67.52

नाशिक- पेट्रोल 79.33 तर डिझेल 68.19

नागपूर- पेट्रोल 79.14 तर डिझेल 68.03

अहमदनगर- पेट्रोल 78.76 तर डिझेल 67.65

सिंधुदुर्ग- पेट्रोल 80.23 तर डिझेल 69.08

ठाणे- पेट्रोल 78.54 तर डिझेल 67.38

दरम्यान, केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढून 22.98 रुपये प्रति लिटर केले होते. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून 18.83 रुपये प्रति लीटर करण्यात आले होते.