पुलवामा हल्ल्या प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये पुलावामा हल्ल्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Raj Thackeray (Photo Credits: Instagram)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या सभांमध्ये पुलावामा हल्ल्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस बालाकृष्णन यांनी ही याचिका दाखल केली असून पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. (राज ठाकरे साहेब जरा सांभाळून... आमच्याकडे सुद्धा आहेत व्हिडिओ, भाजप पक्षाने उडविली खिल्ली)

तसंच राज ठाकरे यांच्याकडे देशाच्या सुरक्षिततेबाबत इतकी गंभीर माहिती उपलब्ध असतानाही त्यांनी तक्रार दाखल का केली नाही? असा सवालही याचिकेत विचारण्यात आला आहे.

देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असं मी म्हटलं होतं आणि त्यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी आपल्या एका सभेत केला होता. या वक्यव्यानंतर राज ठाकरेंच्या सीआयडी चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.