पुणे: भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांचा हल्ला; कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने हा वाद झाला. या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

पुणे: भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांचा हल्ला; कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Medha Kulkarni (PC - Facebook)

पुण्यातील (Pune) भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (BJP MLA Medha Kulkarni) यांच्यावर दारुड्यांनी हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने हा वाद झाला. या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक व्यक्ती आपला कुत्रा घेऊन बाहेर निघाला होता. या व्यक्तीला दारू पित बसलेल्या टोळक्याने येथे बसू नका अशी धमकी दिली. त्यानंतर या टोळक्याने संबंधित व्यक्तीसोबत कुत्रा अंगावर सोडतो का? असं म्हणत वाद घातला. त्यामुळे ही व्यक्ती टोळक्याच्या धमक्यामुळे तेथून पुढे जाण्यास निघाली. परंतु, टोळक्यातील एकाने या व्यक्तीच्या दिशेने बाटली फेकून मारली. हा सर्व प्रकार पाहून दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी आले. मात्र, मदयधुंद असलेल्या टोळक्याने या सर्वांना धक्काबुक्की केली. (हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू)

हा सर्व गोंधळ ऐकून सोसायटीतील नागरिक आणि मेधा कुलकर्णी वाद होत असलेल्या ठिकाणी पोहोचले. मद्यधुंद असलेल्या टोळक्याने या सर्वांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली.

दरम्यान, या प्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात सतत घडत आहेत, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2020 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).