दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम; RT-PCR Test रिपोर्ट निगेटीव्ह असणं अनिवार्य
गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सुरुवातीपासूनच कोविड-19 संकटाचा प्रभाव महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली (Delhi), गोवा (Goa), गुजरात (Gujarat) आणि राजस्थान (Rajasthan) हून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट कॅरी करणे अनिवार्य आहे. हा नियम ट्रेन आणि विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट आणणे राहून गेल्यास विमानतळावर कोविड-19 टेस्ट करावी लागेल. तर या राज्यातून ट्रेन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांच्यात लक्षणे आढळतात का, हे तपासले जाईल.
विमान प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्याला कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल. ट्रेन प्रवासादरम्यान RT-PCR टेस्ट रिपोर्ट कॅरी न केलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येईल. (Lockdown Again in Maharashtra? महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार? राजेश टोपे, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)
ANI Tweet:
विमान किंवा ट्रेन प्रवासापूर्वी 72-96 तास आधी RT-PCR टेस्ट करणे गरजेचे आहे. देशातील अनेक राज्यांनी प्रवाशांची RT-PCR किंवा रॅपिड अॅंटीजन रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. परंतु, कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्यामुळे प्रवासासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, 30 नोव्हेंबर नंतर दिल्लीवरुन येणाऱ्या प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. त्याचप्रमाणे पुढील 10 दिवसांची पाहाणी करुन दुसऱ्या लॉकडाऊनविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.