Sanjay Raut यांना बेल की पुन्हा जेल? राऊतांच्या जामीन अर्जावर आज महत्वाची सुनावणी

संबंधित कोठडी आणि जामीन अर्जावर आज एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter/ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Land Scam) अटक करण्यात आली होती. तरी प्रकरणी आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान संजय राऊतांना बेल (Bail) मिळेल की पुन्हा जेल (Jail) असा प्रश्न उपस्थित होत आहे.  शिवसेना (Shiv Sena) नेत्याने या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलएशी (PMLA) संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले होते की, राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाला विरोध केल्याने आपला छळ करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.

 

शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या याचिकेला विरोध करत विशेष न्यायालयात उत्तर दाखल केले होते. तरी या संबधीत महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना 1 ऑगस्ट रोजी मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक करण्यात आली होती. तरी दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतरही संजया राऊतांना बेल (Sanjay Raut Bail) मिळालेली नाही म्हणून आजच्या सुनावणीला विशेष महत्व आहे. (हे ही वाचा:- Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी; 608 पैकी 51 आगोदरच बिनविरोध)

 

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Land Scam) अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांची (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे. राऊतांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रावरही  आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.