IPL Auction 2025 Live

मुंबई: गोरेगाव च्या Nesco कोविड सेंटर मध्ये रुग्णांसह येथील कर्मचा-यांचा रंगला रासगरबा, Watch Video

गोरेगावच्या Nesco कोविड सेंटर मध्ये रुग्णांनी येथील कर्मचा-यांसह रासगरब्यावर ठेका धरला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत येथील रुग्ण गरब्याचा आनंद घेताना दिसत होते.

Goregaon COVID Centre (Photo Credits: ANI/Twitter)

देशभरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असली तरीही कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दर दिवसा दुपटीने वाढत आहे. कोविडची लक्षणं नसली तरीही कोरोना संक्रमित (Coronavirus Positive) व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत असल्याने देशभरात रुग्णालयांसह अनेक ठिकाणी कोविड सेंटर (COVID Centre) उभारण्यात आली आहे. येथे रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच यंदा कोरोनामुळे नवरात्रीच्या (Navratri) दांडिया उत्साहावर विरजण पडल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. हेच दु:ख कोविड वर उपचार घेणा-या रुग्णांचे देखील आहे. मात्र यावर उपाय शोधत गोरेगावच्या कोविड सेंटरमधील रुग्णांनी एक वेगळीच शक्कल शोधून काढली. येथे सेंटरच्या कर्मचा-यांसह रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये गरब्याच्या (Garba) गाण्यावर ठेका धरला.

ऐकून विश्वास बसत नाही ना! पण हे खरे आहे. गोरेगावच्या Nesco कोविड सेंटर मध्ये रुग्णांनी येथील कर्मचा-यांसह रासगरब्यावर ठेका धरला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत येथील रुग्ण गरब्याचा आनंद घेताना दिसत होते. Coronavirus in India: फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात कोरोना व्हायरस सक्रीय रुग्णांची संख्या असू शकते फक्त 40,000; आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

पाहा व्हिडिओ:

मुंबईत काल (19 ऑक्टोबर) दिवसभरात 1233 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,43,172 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 9,776 वर पोहोचला आहे. सद्य घडीला मुंबईत 18,624 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

तर भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा  75 लाखांच्या पार गेला आहे. 24 तासांत 55,722 नवीन कोरोनाबाधितांचे निदान, 579 जणांचा मृत्यू  झाला आहे. देशात 7,72,055 जणांवर उपचार सुरू आहेत.