Parshuram Ghat In Konkan Closed: दरड कोसळल्याने परशूराम घाट बंद; पर्यायी मार्गाने कोकणात जाण्याच्या सूचना

मात्र आता पुन्हा दरड कोसळल्याने तो सध्या बंद करून पर्यायी मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

Ghat | Twitter

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) काल झालेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटामध्ये (Parshuram Ghat) पुन्हा दरड कोसळल्याची (Land slide) घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai Goa Highway) जाणारी वाहतूक रेंगाळली आहे. परशुराम घाट हा कोकणातील सध्या धोकादायक वळणाचा रस्ता आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामासोबत आता परशूराम घाटाच्या देखील सपाटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र अशातच अवकाळी बरसणार्‍या पावसातही परशूराम घाटात दरड कोसळली असल्याने सध्या कोकणात आणि गोव्याकडे जाणार्‍यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

परशूराम घाट वगळून पर्यायी मार्ग कोणते?

(हे देखील नक्की वाचा: Maharashtra Assembly Monsoon Session 2022: कोकणवासियांचा प्रवास होणार सुकर; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानसभेत दिली 3 महत्त्वाची आश्वासनं) .
सध्या परशूराम घाट रूंदीकरण आणि सपाटीकरण करण्यासाठी विशिष्ट काळासाठी बंद ठेवला जातो. मात्र आता पुन्हा दरड कोसळल्याने तो सध्या बंद करून पर्यायी मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या सुट्ट्यांच्या काळ सुरू असल्याने दापोली, रत्नागिरी आणि तळ कोकणात समुद्र किनारी आनंद लुटण्यासाठी आबालवृद्धांची नोठी गर्दी पहायला मिळत आहे. सध्या रेल्वेचं रिझर्व्हेशन फुल्ल आहे. त्यामुळे अनेकजण रस्ते मार्गे कोकणात जात आहेत.