Swapnil Kusale Receives Cash Reward from Maharashtra Govt: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी रुपयांचे रोख बक्षीस (Watch Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Swapnil Kusale Receives Cash Reward (फोटो सौजन्य - एक्स)

Swapnil Kusale Receives Cash Reward from Maharashtra Govt: यावर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मध्ये कांस्यपदक (Bronze Medal) जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याला सोमवारी महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. स्वप्नील कुसाळेचे वडील आणि भाऊ जिल्हा शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. तर त्याची आई कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याचा आशियाई विक्रम मोडणारा ॲथलीट सचिन सर्जेराव खिलारी यांचाही सन्मान करण्यात आला. स्वप्निल कुसाळे आणि त्याचे प्रशिक्षक देशपांडे, पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी आणि त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण, बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेता विदित गुजराथी आणि त्याचे प्रशिक्षक संकल्प गुप्ता, तसेच बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेती दिव्या देशमुख आणि तिचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांना त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. (हेही वाचा - Swapnil Kusale: नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे वडील नाराज, राज्य सरकारबद्दल व्यक्त केली खंत)

स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्वप्निलला सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. स्वप्निलला राज्य सरकारने किमान पाच कोटी रुपये जाहीर करावे. तसेच त्याला बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी देखील मागणी सुरेश कुसाळे यांनी केली होती. दरम्यान, आज महायुती सरकारने स्वप्निलला दोन कोटी रुपयाचा धनादेश दिला आहे. (हेही वाचा, Swapnil Kusale Wins Bronze: पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले)

कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटींचा धनादेश - 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रसंगाचे तसेच व्हिडिओ फोटो आपल्या एक्स हँडलवरून शेअर करत स्वप्निल तसेच इतर खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.