मुंबईत शालेय बससाठी 'थांबा' सुविधा, पालकांची लवकरच या त्रासापासून होणार सुटका

बेस्टच्या बसला (BEST Buses) ज्या पद्धतीने प्रवशांना चढण्यासाठी अथवा उतरण्यासाठी थांबा दिले जातात. त्याच पद्धतीने आता मुंबईतील (Mumbai) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बससाठी (School Buses) खास थांबा दिला जाणार आहे.

School Bus (wikimedia)

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या बसला (BEST Buses) ज्या पद्धतीने प्रवशांना चढण्यासाठी अथवा उतरण्यासाठी थांबा दिले जातात. त्याच पद्धतीने आता मुंबईतील (Mumbai) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बससाठी (School Buses) खास थांबा दिला जाणार आहे.  तसेच या थांब्याची निर्मिती झाल्यानंतर पालकांची (Parents) धावपळ कमी होणार आहे. पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी थांबा व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी मुंबईत थांबा उभारण्यासाठी योग्य जागेची पाहणी केली जात आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी खास बस थांबे उभारले जावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आता मुंबईत असे थांबे कुठे उभारता येतील, यासाठी जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व बसथांबे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी असतील. त्याचबरोबर बसमध्ये चढण्यासाठी गडबडीच्या वेळी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही, याचीही काळजी घेतली जावी, असे निर्देश वाहतूक प्राधिकरणाने आरटीओला दिले आहेत. हे देखील वाचा-पुणे: दारूच्या नशेत ट्र्क चालकाची दुचाकी स्वारांना धडक; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

योग्य जागेची निवड करण्यासाठी आरटीओचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर आरटीओचे अधिकारी त्यांची यादी प्रशासनाकडे सोपवतील. त्यानंतर शालेय बससाठी निवडलेल्या जागेवर फलक लावले जातील. त्या ठिकणाहून शालेय बसला विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागणार आहे.